माझे बाबा....❤️💝
माझे बाबा.....❤️ आई, ताई, दादा यांच्या पुढेही एक नातं असतं. त्या नात्याचं नाव 'बाबा' असतं. काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं माझ्या बाबांच व्यक्तिमत्व नाही. जन्म झाल्या झाल्या ज्यांनी. मला पहिल्यांदा हातात घेतलं ते माझे बाबा..... माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि पुन्हा सकाळी कामावर जायला तयार असणारे माझे बाबा..... बोट धरून चालायला शकवणारे , पाठ दुखतं असली तरीही मला आंगाखांद्यावर खेळवणारे माझे बाबा..... कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक आडचनीत खंबीरपणे उभे राहून सगळ्यांना आधार देणारे माझे बाबा..... आई ने कधी मारले तर तिच्या वरच रागावणारे पण परीक्षेत कमी गुण मिळाले तर तेवढेच रागावणारे माझे बाबा..... वाईट वागल्यवर खूप ओरडणारे पण छोटी चूक झाल्यास ती पोटात घालून प्रोत्साहन देणारे म...